ठाण्यात पाऊस ‘सैराट’, रस्ते-रेल्वे वाहतूक विस्कळीत

July 31, 2016 1:53 PM0 commentsViews:

Thane train2

31 जुलै :  गेल्या दोन दिवसांपासून मुंबई, ठाण्यात येऊन-जाऊन असलेल्या पावासाने आज ठाण्याला अक्षरश: झोडपून काढलं आहे. या पावसामुळे जनजीवन पार विस्कळीत झालं असून वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.

ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ पट्‌ट्यात पहाटेपासून सुरू असलेला पाऊस थांबायलाच तयार नसल्यानं अनेक रस्ते आणि रूळ पाण्याखाली गेले आहेत. ठाण्यात प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोनच्या ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे ठाणे स्थानकात लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे अनेक प्रवासी लोकल आणि रेल्वे स्थानकात अडकून पडले आहेत.

मुसळधार पावसामुळे पारसिक बोगद्याजवळच्या रेल्वे ट्रॅकवर डोंगरावरची माती पडल्यानं आणि ठाण्यातील रूळ पाण्याखाली गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. तास-तासभर अनेक प्रवासी ट्रेनची वाट पाहत असून रेल्वे प्रशासनाचीही तारांबळ उडाली आहे. तर कल्याण ते सीएसटी जलद मार्ग ठप्प झाला होता. त्यानंतर जलद मार्गावरची वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली होती. आता मात्र लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. ठाण्यातील अनेक भागात पाणी साचले असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.

सुदैवानं, रविवार असल्याने नोकरदार, चाकरमानी मोठ्या संकटातून वाचले आहेत. अगदीच आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close