न्यायालयीन प्रक्रियेतील संथगतीने गुन्हेगारीत वाढ – शरद पवार

July 31, 2016 3:32 PM0 commentsViews:

Sharad pawar213

अहमदनगर – 30 जुलै : कोपर्डी घटनेतील पीडितेच्या कुटुबीयांची आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत, न्यायालयीन प्रक्रियेवर ताशेरे ओढले. न्यायालयीन प्रक्रिया लांबल्यानेच गुन्हेगारी वाढली असल्याचं मत पवारांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं.

पवार म्हणाले की, ‘कोपर्डीसारख्या अमानवी घटना रोखण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया तातडीनं पुर्ण करायला हवी. दिल्लीतील घटनेनंतर जसा खटला जलदगतीने चालला, तसंच याही घटनेचा निवाडा जलदगती न्यायालयात व्हायला हवा. तरच गुन्हेगारांना चाप बसेल.

यावेळी त्यांनी कायद्यात बदल करण्याची मागणी करणार्‍यांवरही अक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, ‘काही लोक कायद्याबद्दल बोलत आहेत. परंतु कायदा बदलणं, हे काही एखाद दुसर्‍या व्यक्तीच्या हातात नाही. त्यासाठी संसदेमध्ये चर्चा व्हावी लागते, त्यावर एकमत व्हाव लागतं. समोरच्या बाजूचं म्हणणं एकून घ्यावं लागत’.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close