अवैध धंदे आढळल्यास एसपींवर कारवाई

April 9, 2010 9:10 AM0 commentsViews: 8

9 एप्रिलराज्याच्या कोणत्याही भागात अवैध धंदे आढळले तर संबंधित एसपीवर कारवाई करण्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधानसभेत केली. मटका, डान्सबारसारखे अवैध धंदे कुठेही सुरू असल्याचे आढळल्यास त्वरीत ही कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. तसेच कोणताही पोलीस दारू पिऊन ड्युटीवर आल्यास त्याला तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात येईल. मीरा भाईंदरमध्ये जर डान्स बार सुरू असतील, तर संबंधित पोलीस अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.तर भरतीतील गोंधळ आणि गर्दी लक्षात घेता, पोलीस भरती नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन करणार असल्याची घोषणाही आर. आर. यांनी सभागृहात केली.

close