उत्तर प्रदेशमध्ये महामार्गावर मायलेकीवर सामूहिक बलात्कार

July 31, 2016 2:49 PM0 commentsViews:

rape_634565

31 जुलै :  गाझियाबाद आणि अलिगडला जोडणार्‍या दिल्ली कानपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या गँगरेपच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कारला अडवून कुटुंबाला लुटत मायलेकीवर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळपास तीन तास हे नराधम दोघींवर अत्याचार करत होते. यात अजून एकालाही अटक झालेलं नाही, पण 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

नॉएडाहून शाहजहांपूरला जाणार्‍या एका कुटुंबावर ही दुदैर्वी वेळ ओढवली आहे. शुक्रवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास महामार्गावर काही नराधमांनी रस्त्यावर सळ्या लावून ठेवल्या होत्या. गाडी जेव्हा त्यांच्यावर आदळली, तेव्हा चालक गाडीचं किती नुकसान झालंय, ते पहायला बाहेर उतरला. तेवढ्यात या नराधमांनी आई आणि मुलींना बाहेर काढून त्यांना शेतात खेचून नेलं. तिथेच दोघींसोबत अत्याचार केल्या केले. त्यानंतर 11 हजार रोकड आणि दागिने घेऊन ते पसार झाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close