दिवाळीच्या तोरणांवर चिनी छाप

October 15, 2008 5:19 AM0 commentsViews: 5

15 ऑक्टोबर, पणजीदिवाळी आता अवघ्या पंधरवड्यावर येऊन ठेपली आहे. आणि दिवाळी म्हटली की दारावर तोरण आलीच की. पण यंदा दिवाळीच्या तोरणांची बाजारपेठ यंदा चिन्यांनी काबीज केल्याचं स्पष्ट झालं आहे. 'एकतर ही चिनी तोरणं स्वस्त असतात आणि दुसरं म्हणजे यात खूप व्हरायटी मिळतात त्यामुळे मी चिनी तोरणंच विकत घेतो,' असं बहुतेक ग्राहकांचं म्हणणं आहे.पूर्वीची एकच तोरण वर्षानुवर्षं वापरायची पद्धत आता कालबाह्य झाली आहे. आणि आजच्या युज अ‍ॅण्ड थ्रोच्या जमान्यात चिनी तोरणंबरी वाटतात असंही काही ग्राहकांचं म्हणणं आहे. डॉलरचा भाव वाढल्याचा परिणाम चिनी तोरणांच्या दरांवरही झाला आहे.त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तोरणं थोडीशी महाग आहेत. पण ग्राहकांची पसंती चिनी तोरणांनाच आहे.

close