खूशखबर!!…पेट्रोल, डिझेल स्वस्त

July 31, 2016 8:10 PM0 commentsViews:

petrol_price_hike

31 जुलै : महागाईनं बेजार झालेल्या सर्वसामान्यांसाठी; विशेषतः वाहनधारकांसाठी खूशखबर आहे. पेट्रोल आणि डिझलेच्या दरात कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटरला 1 रुपया 42 पैसै; तर डिझेल 2 रुपये 01 पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यानुसार नवे दर आज मध्यरात्रीनंतर लागू होणार आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात चढउतार होत आहेत. त्यामुळे आताही कच्च्या तेलाच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे.

15 जुलैला पेट्रोलच्या दरात प्रतिलिटरमागे 89 पैसे, तर डिझेलच्या दरात 49 पैशांनी कपात करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा पेट्रोल-डिझेल स्वस्त झाल्याने वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close