देव तारी त्याला… तब्बल सात तासांनंतर 7 महिन्यांचं बाळ सुखरुप

July 31, 2016 8:41 PM0 commentsViews:

Bhiwandi12ËêÖêêÖê3

भिवंडी – 31 जुलै :  भिवंडीतील गैबीनगर परिसरात कोसळलेल्या इमारतीच्या ढिगार्‍याखालून 7 महिन्याच्या बाळाला सुखरुप बाहेर काढण्यात आल आहे. तब्बल सातानंतर अब्दुल रेहमान या बाळाला एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढलं. त्यानंतर अब्दुलला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि प्राथमिक उपचारानंतर आजीकडे सोपवण्यात आले. या दुर्घटनेत अब्दुलच्या आईचा मृत्यू झाला.

दरम्यान ढिगार्‍याखाली अडकलेल्या व्यक्तींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून बचाव मोहीम सुरु आहे; परंतु पावसामुळे या कामात अडथळा येत आहेत.

भिवंडी परिसरात मध्यरात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत असल्याने मोडकळीस आलेली इमारत रविवारी सकाळच्या सुमारास कोसळली. यात आतापर्यंत 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. काही जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ढिगार्‍याखाली आणखी काही लोक अडकल्याची माहिती असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close