ससूनमध्ये निवासी डॉक्टारांना मारहाण

August 1, 2016 8:45 AM0 commentsViews:

01 आॅगस्ट : पुण्याच्या ससून रुग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरांना जबर मारहाण करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्ण दगावल्याचा आरोप करत रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉ. सादिक मुल्ला आणि डॉ. अभिजीत जवानजा यांना बेदम मारहाण केली आहे.

मारहाणीत दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससूनमध्येच उपचार सुरू आहेत. दरम्यान, मारहाणीप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मारहाण करणार्‍या 5 जणांना पोलिसांनी अटक केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close