मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कसारा-आसनगाव वाहतूक ठप्प

August 1, 2016 8:25 AM0 commentsViews:

mumbai_local3

मुंबई – 01 आॅगस्ट :  या ना त्या कारणांमुळे विस्कळीत होणारी मध्य रेल्वेची वाहतूक आज (सोमवारी) पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या कल्याण-कसारा मार्गावरील आटगाव-खर्डी स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं कल्याण-कसारा अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. यामुळं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांना याचा फटका बसला असून कल्याण-कसारा मार्गावरील रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली आहे.
रात्रभर सुरू असलेल्या पावसानं खर्डी स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणेत सोमवारी सकाळी 7:30 च्या सुमारास बिघाड झाला. त्यामुळं सीएसटीहून कसार्‍याकडं जाणारी डाऊन लोकल आटगाव-खर्डी दरम्यान खोळंबली. त्यानंतर सिग्लन यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी आसनगाव ते कसारा दरम्यानची वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आणि तात्काळ दुरुस्तीचं काम हाती घेतलं. मात्र दुरुस्ती होईपर्यंत कल्याण ते कसारा दरम्यानच्या दोन्ही मार्गावरील गाड्यांची वाहतूक आसनगावपर्यंत सुरू ठेवण्यात आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close