सोलापूर : इमारतीसाठी खणलेल्या खड्यात पडून मुलाचा मृत्यू

August 1, 2016 4:38 PM0 commentsViews:

solapu3सोलापूर, 01 ऑगस्ट : इमारतीसाठी खणलेल्या ख़ड्‌यात पडून एका 13 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोलापुरात घडलीये. पियुष वळसंगकर असं या मुलाचं नाव आहे.

सोलापुरातील सिंधु विहार परिसरात इमारतीचं काम सुरू आहे. त्यासाठी खोदलेल्या ख़ड्‌ड्यात पावसाचं पाणी साचलं होतं. पियुषला तो खड्डा दिसला नाही. या खड्‌ड्यात पडून पियुषचा मृत्यू झाला. महापालिका आणि बिल्डरच्या ढिसाळ कारभारामुळे पियुषचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close