…आणि लातूरकरांच्या चेहर्‍यावर हसू उमटले, 10 महिन्यांनंतर आले नळाला पाणी !

August 1, 2016 4:54 PM0 commentsViews:

01 ऑगस्ट : हंडाभर पाण्यासाठी हैराण झालेल्या लातूरकरांच्या चेहर्‍यावर आज हसू उमटले. तब्बल 10 महिन्यानंतर लातूरकरांच्या नळाला पाणी आले आहे. नळाला पाणी आल्याचं पाहून लातूरकरांनी एकच जल्लोष केलाय.

latur_waterदुष्काळग्रस्त लातूरमध्ये तब्बल दहा महिन्यानंतर नळाला पाणी आलंय. सकाळी महापौर दीपक सूळ यांच्या हस्ते पाण्याची मशीन सुरू करण्यात आली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गेल्या आठवड्यापर्यंत कोरड्या असलेल्या मांजरा नदीत पाणी आलंय. दोन दिवसांपासून या भागात 70 मिलीमिटर एवढा पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्याची पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू झालीये. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेल्या आर्वी जलशुद्धीकरण केंद्रातल्या मशीनचा आवाज पुन्हा घुमू लागलाय. मांजरा धरणावरील बॅरेजची क्षमता आठ टीएमसी एवढी आहे. एवढा पाणी साठा होण्यासाठी काही काळ जावा लागणार आहे. मात्र तुर्तास तरी लातूरकरांना मोठा दिलासा मिळालाय. तसंच पाणी पुरवठ्यासाठी धावणार्‍या जलदूत एक्स्प्रेस बंद करण्याबाबत निर्णय होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close