रजत बडजात्यांच्या शोकसभेत सलमानला अश्रू अनावर

August 1, 2016 5:21 PM0 commentsViews:

दबंग सलमान खानला आपण नेहमीच वेगवेगऴ्या कणखर अभिनेत्याच्या भूमिकेत पाहिले आहे. पण रिअल लाईफमध्ये हळव्या सलमानची झलक पाहण्यास मिळालीय. दिग्दर्शक सुरज बडजात्या यांचा भाऊ रजत बडजात्या यांचं निधन झालं. शनिवारी त्यांच्या शोकसभेत सलमान ही पोहचला होता. त्यावेळी त्याला अश्ाू्र अनावर झाले. रजत आणि सलमान खूप चांगले मित्र होते. रजत यांच्या ‘मैने प्यार किया’ सिनेमामधून सलमानने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. रजत यांना कॅन्सर झाला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रजत यांच्या निधनामुळे सलमान दुखी झाला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close