बीडकडे पावसाची पाठ, अजूनही 100 हुन अधिक गावात टँकरने पाणीपुरवठा

August 1, 2016 6:24 PM0 commentsViews:

बीड,01 ऑगस्ट : मराठवाड्यात मागील दोन दिवसांपासून सर्वत्र पाऊस सुरू आहे पण बीड जिल्ह्यात मात्र अत्यल्प पाऊस झाला. या जिल्ह्यात अजूनही टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. जिल्ह्यात 100 पेक्षा जास्त गावात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतोय. जिल्ह्यातील बिंदुसरा धरण हे देखील कोरडेच असून माजलगाव धरणात केवळ 2 टक्के पाणीसाठा वाढला आहे.beed_rain

लातूरमध्ये चांगला पाऊस झाल्यानं मांजर धरणात पाणी साठा चांगलाच वाढला त्यामुळं केज आणि अंबाजोगाई परिसरातील पाणी टंचाई काही अंशी दूर झाली आहे तर जिल्ह्यातील 9 तालुक्यात मात्र कमी जास्त प्रमाणात टंचाई आज ही दिसून येते. जिल्ह्यात या वर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेनं केवळ 44 टक्केच पाऊस झाला, विभागात इतर जिल्ह्यात मात्र मोठा पाऊस झाला असताना बीड जिल्ह्याकडे पावसानं पाठ फिरवली अशी स्थिती  आहे.

जिल्ह्यात एका तर मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. त्यातच याही वर्षी चांगला पाऊस पडलं असं वाटत असताना मात्र केवळ पीक जगतील असाच पाऊस आतापर्यंत झालाय. जिल्ह्यात शिरूर तालुक्यात आणि वडवणी तालुक्यात तुलनेनं बरा पाऊस झाला आहे. बीड, आष्टी. पाटोदा, गेवराई, धारूर या तालुक्यात मात्र फारच कमी पाऊस झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close