गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा

August 1, 2016 7:06 PM0 commentsViews:

01 ऑगस्ट : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. गुजरातच्या भाजपच्या अध्यक्ष विजय रुपानी यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. आनंदीबेन पटेल यांनी फेसबुकवर पोस्ट लिहुन आपण सर्व जबाबदारीतून मुक्त होत आहोत अशी निवृत्तीची घोषणाच केलीये. तसंच नव्या पिढीच्या हाती नेतृत्व सोपवावं असा सल्लाही जातात आनंदीबेन पटेल यांनी दिलाय.anandiben_patel

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा मिळाल्याचं मान्य केलं असून त्यांच्या राजीनाम्यावर भाजपची संसदीय समिती निर्णय घेईल असं सांगितलंय. काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये कथित गोरक्षकांनी दलितांना मारहाण केल्यानंतर गुजरातमधलं वातावरण तापलंय. काल अहमदाबादमध्ये झालेल्या दलित महासंमेलनात राज्यभरातल्या हजारो दलितांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आनंदीबेन यांनी राजीनामा दिल्याचं मानलं जातंय. विशेष म्हणजे आनंदीबेन पटेल यांनी फेसबुकवर एक पोस्ट प्रसिद्ध केलीये.आपण आता 75 व्या वर्षांत पदार्पण करत आहोत.त्यामुळे सर्व जबाबदारीतून मुक्त व्हायचंय. नव्या पिढीला आता संधी दिली पाहिजे. व्हायब्रंट गुजरात 2017 चं स्वप्न साकार करण्यासाठी नव्या मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला पाहिजे अशी भावना आनंदीबेन पटेल यांनी व्यक्त केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close