लाईफलाईन नव्हे ‘डेथलाईन’, दररोज 18 जणांचा बळी

August 1, 2016 8:28 PM0 commentsViews:

मुंबई, 01 ऑगस्ट : मुंबईत लोकल ही लाईफलाईन नसून डेथ लाईन बनलीये. कारण हीच लोकल दररोज 18 जणांचा जीव घेतेय. एखाद्या युद्धातही मारले जाणार नाहीत इतके लोक दरवर्षी लोकल अपघातात मरतात. हे आम्ही म्हणत नाही आहोत तर हे म्हणण आहे कॅगचं.mumbai_local_accident

मुंबईत दररोज 75 लाखांहून अधिक प्रवासी लोकलमध्ये प्रवास करतात. कारण ही वाहतुकीचा सर्वात स्वस्त आणि वेगवान असा पर्याय आहे. लोकल बंद पडली की मुंबई थांबते अणि म्हणूनच तीला लाईफ लाईन म्हणतात. पण आज लोकल ही डेथ लाईन म्हणजे मृतवाहिनी झाली आहे. कारण लोकलने प्रवास करणारे दररोज 18 जण मृत्यूमुखी पडतात. हा अहवाल दिलाय कॅगने म्हणजे कंट्रोलर एन्ड ऑडिटर जनरल यांनी. 2010 ते 2014 या कालावधीत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येवरून त्यांनी हा निकर्ष काढलाय. जानेवारी 2010 ते डिसेंबर 2014 या 4 वर्षांत 33 हजार 445 जणांचा मृत्यू झालाय. लोकलच्या एका डब्याची क्षमता ही 2,510 जणांची आहे. पण प्रत्यक्षात याहून तिप्पट लोक प्रवास करतात. या अहवालात 15 टक्के मृत्यू हे अतिगर्दीमुळे झाले आहे. तर 59 टक्के मृत्यू हे रेल्वे रुळ ओलांडताना झाल्याचं सांगण्यात आलंय.

लाईफलाईन बनली डेथलाईन

- जानेवारी2010 ते डिसेंबर 2014 या 4 वर्षांत 33 हजार 445 जणांचा मृत्यू
- रोज 18 हून जास्त अधिक प्रवाशांचा लोकल अपघातात मृत्यू
- लोकलच्या एका डब्याची क्षमता 2,510 जणांची
- प्रत्यक्षात याहून तिप्पट लोक करतात प्रवास
- 15 टक्के मृत्यू अतिगर्दीमुळे
- 59 टक्के मृत्यू हे रूळ ओलांडताना


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close