बिग बींच्या घरात ‘बुलेट’ !

August 1, 2016 8:35 PM0 commentsViews:

big_b_bullet01 ऑगस्ट : बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील जलसा बंगल्यात एका चाहत्याने घुसण्याचा प्रयत्न केला. बुलेट बनवारीलाल यादव असं या तरुणाचं नाव आहे. बुलेट यादवने बंगल्याच्या भिंतीवरुन उडी मारुन घरात घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी वेळीच बुलेट यादवला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.

बुलेट यादव हा मूळचा बिहारचा असून, सध्या पुण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अमिताभ बच्चन यांना गाणं ऐकविण्यासाठी बंगल्यात शिरल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. बुलेट यादवला अटक करून त्याला कोर्टात हजर करण्यात आले जिथे त्याला 7 दिवसाची न्यायलयीन कोठडी देण्यात आली आहे. या घटनेमुळे अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बुलेट विरुद्ध कोर्टात आरोपपत्र ही दाखल केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close