पोलिसाने तक्रारदाराकडून चेपले पाय

August 1, 2016 9:51 PM0 commentsViews:

01 आॅगस्ट : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ मध्ये पोलिसांची मुजोरीचं उदाहरण पुढे आलंय. लखनौमध्ये एक माणूस पोलिसांक़डे तक्रार नोंदवायला गेला होता. त्याची व्यथा ऐकून त्याला मदत करणं तर दूरच पण ठाण्यात हजर असलेल्या या पोलीस अधिकार्‍याने या माणसाकडून आपले पाय चेपून घेतले. जनतेचे रक्षकच जनतेची पिळवणूक करणार असतील तर कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती होईल याचा विचार न केलेला बरा. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झालावर मग पोलीस प्रशासनाला जाग आली आणि या अधिकार्‍याला निलंबित करण्यात आलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close