पालिकेच्या शाळेतच गटारी

August 1, 2016 10:00 PM0 commentsViews:

01 ऑगस्ट : कल्याण डोंबिवली महापालिकेतील गटारीची नशा अजून उतरली नसताना मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षांनी चक्क पालिका शाळेच्या आवारातच झिंगाट पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अनिल भोसले असं या प्रभाग समिती अध्यक्षांचं नावं असून तो सत्ताधारी भाजपचाच पदाधिकारी आहे. या झिंगाट पार्टीवर टीकेची झोड उठताच पालिका आयुक्तांनी यासंबंधी चौकशीचे आदेश दिलेत. आश्चर्याची बाब म्हणजे शाळा व्यवस्थापनाला दमबाजी करून पार्टीसाठी या महाशयांनी चावी घेतल्याचं कळतंय. त्यामुळे झिंगाट प्रभाग समिती अध्यक्षांवर नेमकी काय कारवाई होतेय हेच पाहायचं आहे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close