फुरसुंगीतील कचर्‍यापासून खतनिर्मिती

April 9, 2010 11:58 AM0 commentsViews: 2

9 एप्रिलपुण्यातील फुरसुंगी डेपोतील कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यात उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावच्या गावकर्‍यांनी गावाजवळ असलेल्या पुणे महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडला विरोध केला होता. त्यासाठी त्यांनी कचराबंद आंदोलनही पुकारले होते. याबाबतची लक्षवेधी सूचना आज विधानसभेत चर्चेला आली. या डम्पिंग ग्राऊंडमुळे आजूबाजूच्या गावातील लोकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची तक्रार पुण्यातील स्थानिक आमादारांनी केली. यावर डम्पिंग ग्राऊंडवर खतनिर्मिती प्रकल्प उभारला जाईल, असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी दिले. 30 मेपर्यंत हा प्रश्न न सुटल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक आमदार विजय शिवताडे यांनी दिला आहे.

close