शरद पवारांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान

August 1, 2016 10:38 PM0 commentsViews:

 pawar_tilk_award

पुणे, 01 ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शरद पवारांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच या क्रांतिकारी घोषणेला 100 वर्ष पूर्ण झाली त्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा पुरस्कार मी विनम्रतेनं स्विकारतो अशी भावना शरद पवारांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close