मुंबईकरांसाठी खुशखुबर, पाणीपुरवठा करणारे 4 तलाव ओव्हरफ्लो

August 2, 2016 9:49 AM0 commentsViews:

tansa

मुंबई  – 02 ऑगस्ट :  वरुणराजाने मुंबईकरांवर चांगलीच कृपा केली आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे सात तलावांपैकी चार तलाव आता काठोकाठ भरले आहेत. त्यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

आठवडाभरातील पावसामुळे विहार आणि तुळशी हे तलाव आधीच ओव्हरफ्लो झाले होते. आता दमदार पावसामुळे मोडकसागर आणि तानसा तलवाही भरुन वाहत आहे. त्यामुळे मुंबईकरांवरील पाणीकपातीची टांगती तलवार दूर झाली आहे.

तानसा धरणातून मुंबईतल्या पूर्व उपनगरांना पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी झालेल्या अपुर्‍या पावसामुळं मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मुंबईत पाणीकपातही सुरु होती. येत्या काही दिवसात आणखी पाण्याचासाठा वाढण्याची अपेक्षा आहे. पुढच्या वर्षापर्यंत मुंबईकरांवरचं पाण्याचं टेन्शन आता लवकरच दूर होईल, असं म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, पुढील 12 तास मुंबई, कोकणकिनारपट्टीसह राज्याच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close