मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस

August 2, 2016 1:41 PM0 commentsViews:

Devendra fadnavis in VS

02 ऑगस्ट :   दोन वर्षांपूर्वी जनता निवडून दिल्यानंतर मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तुर्तास स्वतंत्र विदर्भासाठी राज्य सरकारचा कोणताच प्रस्ताव नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावलं.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी करताच विरोधक आक्रमक झाले आहेत. धनंजय मुंडे आणि नारायण राणे यांनी फडणवीस सरकारला या मुद्यावर धारेवर धरलं आहे. दुसरीकडे मित्र पत्र शिवसेनादेखील अखंड महाराष्ट्रची मागणी करत भाजपाच्या विरोधात एल्गार केला आहे.

विरोधकांच्या आक्रमकतेला उत्तर देताना मुख्यमंत्री सभागृहात बोलत होते. फडणवीस म्हणाले, वेगळ्या विदर्भाला माझा पूर्णपणे समर्थन आहे. मात्र, राज्यसरकारकडे तुर्तास याबाबत कोणतेच प्रस्ताव नाही. जनतेने मला निवडूण दिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाला माझी राजीनामा मागण्याचा कोणताच अधिकार नाही. मी जनतेला उत्तर देण्यास तयार आहे.

निवडणूकीच्या सुरूवातीलाच वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव ठेवूनवच निवडणूक लढविले होते. जनतेला अंधारात ठेवून मत मागितले नव्हते. तुर्तास राज्यसरकार वेगळ्या विदर्भाचा कोणताच प्रस्ताव मांडत नाही. त्यामुळे सभागृहाची कामकामज बंद न करता, पुढे चालू ठेवावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close