म्हाडाची सोडत 18 मे रोजी

April 9, 2010 12:28 PM0 commentsViews: 4

9 एप्रिलम्हाडाच्या घरांसाठी सोडत 18 मे रोजी काढली जाणार आहे. नागरिकांना स्वस्त दरामध्ये घर उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा यावर्षी 3 हजार 449 घरांची विक्री करणार आहे. त्यासाठी म्हाडाकडे सव्वा तीन लाख अर्जदेखील आले आहेत. या अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतर अठरा मे रोजी म्हाडाच्या या घरांची सोडत निघणार आहे. ही सोडत ऑनलाईन लॉटरी प्रमाणे असणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारर्दशी असल्याचा म्हाडाने दावा केला आहे.

close