इच्छाशक्तीच्या बळावर अंधांनी केली संगीत साधना

October 15, 2008 5:44 AM0 commentsViews: 15

15 ऑक्टोबर, पुणेअंधांना पूर्वी अंध म्हणून हिणवलं जायचं, पण आज त्यांनी सगळ्याच क्षेत्रात आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर बाजी मारली आहे. पुण्यातल्या 'सुरसंगम म्युझिकल नाईट्स' या ऑर्केस्ट्रामध्ये काम करणार्‍या अंधव्यक्तींनी हम भी किसीसे कम नही हे दाखवून दिलं आहे.लहानपणापासूनच दृष्टिहीन असलेला कुलदीप रावल सध्या सुरसंगम नाईट्स ग्रुपमध्ये म्युझिक टीचर म्हणून काम करत आहे. सूरसंगम म्युझिकल नाईट्स या ऑर्केस्ट्रामध्ये पंधरा अंध व्यक्ती काम करत आहेत. पंधरा वर्षांपासून ऑर्केस्ट्रा चालू आहे. या ऑर्केस्ट्रामध्ये अंधमहिलादेखील काम करतात. या ऑर्केस्ट्रामध्ये संध्याकाळी सगळेजण एकत्र येऊन प्रॅक्टीस करतात. अंध असूनदेखील केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर या अंध व्यक्तींनी संगीताची आराधना केली आहे. त्यांच्याकडे असलेली ही जिद्द नक्कीच शिकण्याजोगी आहे

close