कन्हैयाकुमारला विधान परिषदेच्या प्रेक्षक गॅलरीत प्रवेश नाकारला

August 2, 2016 4:50 PM0 commentsViews:

KANHAIYA-KUMAR-facebook02 ऑगस्ट : दिल्लीतील जेएनयूमधील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारला विधान परिषदेच्या प्रेक्षक गॅलरीचा प्रवेश नाकारण्यात आला. विधान परिषदेत वेगळ्या विदर्भावर चर्चा सुरू आहे. ही चर्चा ऐकण्यासाठी कन्हैयाकुमारला काही विद्यार्थी नेत्यांनी बोलावलं होतं.

कन्हैयाकुमार विधिमंडळाच्या आवारात आला होता. यासाठी त्यानं पासही काढला होता. पण ऐनवेळी सुरक्षा रक्षकांनी कन्हैयाकुमारला प्रवेश नाकारला. प्रेक्षक गॅलरीचा प्रवेश नाकारण्यात आल्यानं कन्हैयानं जाहीर नाराजी व्यक्त केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close