मेट्रोत पाकिटमारी पडली महागात, रंगेहात चोर पकडला

August 2, 2016 6:36 PM0 commentsViews:

मुंबई, 02 ऑगस्ट : लोकल ट्रेनमध्ये चोरीच्या अनेक घटना रोजच घडत असतात. मात्र आता मेट्रोमध्ये देखील या अशा घटना घडायला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रोमध्ये प्रवाशांच्या वस्तूंची चोरी करणार्‍या मोहम्मद रईस अब्दूल शेखला रंगेहात पकडण्यात आलंय. काल एका प्रवाशाचं पाकीट चोरी करत असताना मोहम्मद पकडला गेला. प्रवाशांनी या चोराला पकडून चांगलाच चोप दिल आणि मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं.  metro_thife

लोकल ट्रेन मध्ये प्रवषयांच्या बॅग,पाकिटमारी तसंच महिलांचे दागिने चोरीच्या घटना रोजच होतात पण मुंबई मेट्रोमध्ये सुद्धा अशा घटना होत आहे. मुंबई मेट्रोमध्ये रोज हजारो प्रवासी प्रवास करतात यातील काही प्रवाशाचे सुद्धा रोज कुठे ना कुठे अशी पाकीट मारी होते. गेल्या अनेक महिन्यापासून मोहम्मद रईस अब्दुल शेख राहणार गोवंडी हा मेट्रो मधील प्रवाशांचे सामान चोरत होता.

काल रात्री मोहम्मद रईस अब्दुल शेख हा एका प्रवाश्याचं पाकीट चोरी करत असताना घाटकोपर ते जागृती नगर या मेट्रो स्टेशन दरम्यान रंगेहात पकडला. प्रवाशांनी या चोराला पकडलं आणि मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिलं. या सुरक्षा रक्षकांनी घाटकोपर पोलिसांच्या स्वाधीन केलं.

पोलीस तपासात अशी माहिती समोर आली की, हा आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून चोरीची कामं करत होता. तो पाकीट चोरल्यावर त्यातील नगदी पैसे तर काढतच होता पण एटीएम कार्ड चोरलेले एटीएम सेंटरमध्ये जाऊन पैसे काढत होता आतापर्यंत त्याने अशा प्रकारे लाखो रुपये काढले. त्याच्याकडून 14 हजार रुपये जप्त करण्यात आले आहे. मेट्रोत चोरी करणारा पहिला चोर प्रवाशांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या जाळ्यात आला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close