नाशिकमध्ये पावसामुळे आतापर्यंत 4 जणांचा बळी

August 2, 2016 8:05 PM0 commentsViews:

नाशिक, 02 ऑगस्ट : नाशिकनगरीला पुराचा वेढा पडलाय. जिल्ह्यामध्ये या पावसामुळे आतापर्यंत 4 बळी गेले आहेत. सिन्नर तालुक्यातल्या पास्ते गावात सुखदेव सहादू माळी यांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. तर दिंडोरी तालुक्यातील उमराळे गावात अशोक कराटे आणि ठकूबाई कराटे या नवरा बायकोचा मृत्यू झाला. याच दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावात भिंत कोसळून कलाबाई जांगोडे या महिलेचा मृत्यू झालाय. पुरस्थितीमध्ये मदतकार्यासाठी जिल्हाधिकारी आणि लष्करी अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली आहे. त्यासाठी 300 जवान सज्ज आहेत.nashik_rain.jpg (2)

नाशिक जिल्ह्यातली गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आला आहे. गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्यांना पूर
आलाय. गंगापूर, नांदूर मध्यमेश्वर, दारणा, पालखेड, कडवा, चणकापूर या धरणांमधून पाणी सोडण्यात येतंय. मुसळधार पावसानं नाशिक जिल्ह्यातली धरणं तुडुंब भरली आहेत. गोदावरी नदीत 23 हजार क्युसेक्स वेगानं विसर्ग सुरू आहे.

गोदावरी नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे नाशकातील दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी वाढलं आहे. नाशिकसह, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, त्र्यंबकेश्‍वर, कळवण, सुरगाणा तालुक्याला पावसाचा फटका बसलाय. कादवा नदीला 10 वर्षांत पहिल्यांदाच महापूर आलाय. कांद्याचं आगार असलेल्या निफाड तालुक्यातल्या पिंपळगाव बसवंत बाजारपेठेला पुराचा वेढा पडलाय. अनेक पुलांवर पाणी वाहत असल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटलाय. वाहतूक आणि रेल्वेसेवाही विस्कळीत झालीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close