आदिवासी भागात 2 वर्षांत 38 हजार मुलांचा गर्भातच मृत्यू

August 2, 2016 8:27 PM0 commentsViews:

02 ऑगस्ट : मेळघाट आणि राज्यातल्या इतर आदिवासी भागामध्ये लहान मुलांमध्ये कुपोषणाचं प्रमाण अजूनही जास्त आहे. त्यातच राज्यात गेल्या दोन वर्षांत 38 हजार मुलांचा गर्भातच मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. ही आकडेवारी इथेच थांबत नाही तर दोन वर्षांत अशाच प्रकारे दोन हजार 831 मातांचा मृत्यू झाला आहे.adivasi_news3

विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि राज्याच्या काही आदिवासी भागातील कुपोषित मुलांसाठी केंद्र आणि राज्य सरकार दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च करते पण राज्यात गेल्या दोन वर्षांत 38 हजार मुलांचा गर्भातच मृत्यू झाल्याच सरकारने माहितीच्या अधिकारात सांगितले आहे.महाराष्ट्र सरकारच्या राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाकडे बालमृत्यू, अर्भकमृत्यूबाबत नागपुरचे माहिती अधिकारी कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती मागितली होती. या माहितीच्या उत्तरात राज्य सरकारने राज्यात दोनवर्षात 38 हजार मुलांचा गर्भातच मृत्यू झाल्याचे कबूल केलंय. या माहितीमुळे राज्य सरकारच्या उपाययोजना कमकुवत असल्याच पुन्हा एकदा पुढे आल आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close