चव्हाण, विखे पाटलांची हायकमांडकडे तक्रार करणार, मुत्तेमवारांचा घरचा अहेर

August 2, 2016 9:06 PM0 commentsViews:

नागपूर, 02 ऑगस्ट : वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर पृथ्वीराज चव्हाण, विखे पाटील आणि नारायण राणे यांनी कुणाला सांगून शिवसेनेला पाठिंबा दिला ?, हायकमांडने असा कोणताही आदेश दिला नव्हता. त्यामुळे त्यांची पक्षाध्यक्षा सोनिया गांधींकडे तक्रार करणार अशी भूमिका घेत काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी पक्षालाच घरचा अहेर दिला.mutemwar23

वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भाजपची कोंडी केलीये. तर दुसरीकडे काँग्रेसचे विदर्भाचे नेते विलास मुत्तेमवार यांनी आपल्याच नेत्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेतलाय. मुख्यमंत्रीपदावर राहिलेले नेते विदर्भाच्या मुद्यावर शिवसेनेसोबत का गेले ?, हायकमांडने असा कोणताही आदेश दिलेला नाही. या नेत्यांनी विदर्भातील जनतेच्या भावनेशी खेळ केलाय. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब विखे पाटील यांची श्रेष्ठींकडे तक्रार करणार असं विलास मुत्तेमवार यांनी स्पष्ट केलंय. तसंच नारायण राणे, पृथ्वीराज चव्हाण यांना सत्तेत येण्याची घाई झालीये. हे नेते सत्तेशिवाय राहु शकत नाहीत अशी टीकाही विलास मुत्तेमवारांनी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close