हापूसला उष्णतेच्या झळा

April 9, 2010 1:29 PM0 commentsViews: 1

9 एप्रिलअचानक वाढलेल्या तापमानाच्या झळा कोकणच्या हापूस आंब्यालाही बसल्या आहेत. गेल्या पाच दिवसांपासून तापमानात 35 ते 40 अंश सेल्सियस पर्यंत वाढ झाली आहे. त्यामुळे झाडावरचा हापूस देठाकडे भाजून गळून पडत आहे. ही गळ एवढी मोठी आहे, की यंदा जवळपास 20 ते 25 टक्के हापूस वाया जाणार आहे. आधीच फियानमुळे आंबा उत्पन्नात झालेली घट आणि त्यानंतरची ही उष्णता यामुळे कोकणातील आंबा बागायतदार अडचणीत सापडला आहे. आंबा गळून पडण्याच्या भीतीने तो तोडून मुंबई मार्केटमध्ये पाठवण्याकडे बागायतदारांचा कल वाढला आहे. त्यामुळे दलालांनीही आंब्याचा दर उतरवला आहे. उष्णतेमुळे संपूर्ण कोकणात आंब्याचे नुकसान सुमारे 25 ते 30 कोटी असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.

close