जीएसटी विधेयक उद्या राज्यसभेत मांडणार

August 2, 2016 10:54 PM0 commentsViews:

दिल्ली, 02 ऑगस्ट : बहुप्रतिक्षित जीएसटी विधेयक बुधवारी राज्यसभेत मांडलं जाणार आहे. आतापर्यंत काँग्रेसच्या काही मागण्यांमुळे हे विधेयक रखडलं होतं. मात्र, आता काँग्रेसनं सुचवलेल्या 2 दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यामुळे काँग्रेस या विधेयकाला पाठिंबा देईल अशी सरकारला अपेक्षा आहे.GST Bill

राज्यांना करवसुलीमध्ये होणार्‍या नुकसानाची भरपाई म्हणून केंद्राने 3 ऐवजी 5 वर्षांपर्यंत निधी द्यावा ही मागणी सरकारनं मान्य केली आहे, तसंच उत्पादक राज्यांनी 1 टक्का कर रद्द करावा अशीही काँग्रेसची मागणी होती. तीही सरकारनं मान्य केली आहे. मात्र, एकूण करसंकलनावर 18 टक्क्यांची मर्यादा ठेवावी अशी काँग्रेसची मुख्य मागणी होती. ती मात्र सरकारने मान्य केलेली नाही, तसंच गेल्या आठवड्यात अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्येही राज्यांनी काँग्रेसच्या या मागणीला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे काँग्रेसला त्या आघाडीवर माघार घ्यावी लागली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close