बलात्कार प्रकरणी आरोपींना कोठडी

April 9, 2010 2:24 PM0 commentsViews: 2

9 एप्रिलपुण्यातील सांगवीत एका 19 वर्षीय तरूणीवर बलात्कार करणार्‍या लष्कराच्या दोघा जवानांना 15 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.या प्रकरणी अटक केलेले रजनीश कुमार सुरेशचंद्र आणि सुमिंदरसिंग महिपालसिंग या दोघा आरोपींना पिंपरी कोर्टात हजर करण्यात आले. पण कोर्टाच्या आवारात त्यांना महिलांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या आरोपींवर शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी बांगड्या फेकल्या. हे दोघेही आरोपी जवान राजपुताना रायफल्सचे आहेत. हिंजवडी बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात दरम्यान काही दिवसांपूर्वीच झालेले पुण्यातील हिंजवडी सामूहिक बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे. या केससाठी उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा आर. आर. पाटील यांनी केली आहे.नोकरी शोधण्यासाठी पुण्यात आलेल्या महिलेवर गेल्या आठवड्यात बलात्कार झाला होता.

close