मुंबई इंडियन्स कोलमडले

April 9, 2010 3:36 PM0 commentsViews: 1

9 एप्रिलआयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब आमने सामने आहेत. टॉस जिंकून पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. सचिन तेंडुलकर आणि शिखर धवनने मुंबईच्या इनिंगची सुरुवात केली. पण मॅचच्या दुसर्‍याच ओव्हरमध्ये शिखर धवन आऊट झाला. यानंतर आलेला अंबाती रायडू आणि सौरभ तिवारीही झटपट पॅव्हेलिअनमध्ये परतले.सचिनही फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. 29 रन्सवर खेळणार्‍या सचिनला पियुष चावलाने क्लिन बोल्ड केले.

close