मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

August 3, 2016 1:05 PM0 commentsViews:

vlcsnap-2016-08-03-13h08m36s179

03 ऑगस्ट :  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज (बुधवारी) सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळी 9:35 च्या सुमारास एक्स्प्रेसवेवरील मळवली इथे हा अपघात घडला.

अपघात झालेली लँड क्रुझर गाडी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी देवळी गावाच्या हद्दीत गाडीचा अपघात झाला. यामध्ये गाडीच्या चालकासह चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close