रियाझ भटकळनेच घडवला पुण्यातील स्फोट

April 9, 2010 3:46 PM0 commentsViews: 20

सुधाकर कांबळे, मुंबई9 एप्रिलपुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएसला महत्त्वाची माहिती मिळाली आहे. सिमीचा कार्यकर्ता रियाझ भटकळ यानेच हे स्फोट घडवून आणले होते, असेही उघड झाले आहे. रियाझ भटकळचे खरे नाव रियाझ शाबंद्री. तो मूळचा उत्तर कर्नाटक जिल्ह्यातील भटकळ गावचा. समुद्र किनारी असलेले हे गाव तसे स्मलिंगसाठी बदनाम झालेले. तेथील भाषाही थोडीशी वेगळीच आहे. तिथेच रियाझ लहानाचा मोठा झाला. नंतर त्यांने सिमीसाठी काम करायला सुरुवात केली. गेल्या काही वर्षात तो दहशतवादी कारवायांमागील मास्टरमाईंड म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे.मुंबईतील 2002 आणि 2003 मधील बॉम्बस्फोटात रियाझने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या प्रकरणात नूर मोहम्मद अन्सारीला अटक झाली होती. विशेष म्हणजे दहशतवादाचे ट्रेनिंग घेण्यासाठी रियाझनच त्याला पाकिस्तानात पाठवल्याचे दरम्यानच्या तपासात उघड झाले होते. अहमदाबाद बॉम्बस्फोटातील एक आरोपी मोहम्मद सादिक यालाही रियाझनेच ट्रेनिंगसाठी पाकिस्तानात पाठवल्याचे उघडकीस आले आहे.आता पुण्यातील बॉम्बस्फोटात अहमद यासिन उर्फ यासिन भटकळ याचे नाव पुढे आले आहे. 27 वर्षाचा यासिन हा देखील भटकळचाच. मुंबई, अहमदाबादसह अशा एकूण 12 बॉम्बस्फोट प्रकरणी तो हवा आहे. पुण्यातील बॉम्बस्फोट यासिननेच घडवल्याची माहिती पुढे येत आहे. तरुणांचे ब्रेनवॉश करुन त्यांना दहशतवादी ट्रेनिंगसाठी पाकिस्तानात पाठवायचे काम रियाझ करत आहे. आतापर्यंत त्याने अनेक ग्रुप बनवल्याचे पोलीस सांगत आहेत.

close