नाशिकमध्ये पावसाची विश्रांती, नागरिकांची स्वच्छता मोहिम

August 3, 2016 4:25 PM0 commentsViews:

nashik43नाशिक, 03 ऑगस्ट : नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसात शहरात पूरजन्य परिस्थिती होती. त्याचा फटका शहरातील सखल भागांना बसलाय. सराफा बाजारासहीत नदीपात्राजवळील वसाहतींमध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांना अतोनात हाल सहन करावे लागले.आज मात्र पावसाने काहीशी उघडीप घेतल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय.

नदीचं पाणी शिरलेल्या परिसरात आज नागरिकांनी स्वच्छता मोहिमेला सुरूवात केलीये. तर काल जाहीर केल्यामुळे आज शहरातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्यात. गंगापूर धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी कालच्या तुलनेत कमी झालेली असली तरीही आजही ती धोक्याच्या पातळीच्या वरच आहे. परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्यामुळे नागरिकांनी पुराचं पाणी पाहण्यासाठी नदीकाठी एकच गर्दी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close