मंत्रिमहोदयांना महाडदुर्घटनेची सकाळपर्यंत माहितीच नव्हती !

August 3, 2016 6:30 PM1 commentViews:

03 ऑगस्ट : मुंबई गोवा महामार्गावर महाड येथील सावित्री नदीवर एक ब्रिटिशकालीन पूल वाहून गेलाय. या दुर्घटनेत 2 एसटी बसेस वाहून गेल्या आहेत. यात 22 जण होते. आतापर्यंत 2 जणांचे मृतदेह सापडले आहे. युद्धपातळीवर शोधकार्य सुरू आहे. पण, ही दुर्घटना निसर्गनिर्मित होती की मानव निर्मित असा प्रश्न आता उपस्थिती झालाय.

एकीकडे शोधकार्य सुरू आहे तर दुसरीकडे सरकारच्या अक्षम्य हलगर्जीपणा आणि समन्वयाच्या अभावाचा कळस समोर आलाय. ही दुर्घटना काल रात्री 11.30 वाजता घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यरात्री 2 वाजता याची माहिती मिळाली. तर मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांना सकाळी साडे सहा वाजेपर्यंत काय झालं याची माहितीच नव्हती. तर ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ अशी घोषणा करणारे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाही सकाळी सहा वाजेपर्यंत काय झालं ते ठाऊक नव्हतं. पालकमंत्री प्रकाश मेहता यांना तर सकाळी 9 वाजेपर्यंत या घटनेची माहितीच नव्हती.mahad_patil_mehata

खरंतर यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार याचे भाकीत आधीच वर्तवण्यात आलं होतं. आणि त्यानुसार राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अर्ध नाशिक पाण्याखाली गेलंय. तर पावसाचा पट्टा असलेल्या कोकणात अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या आहेत. पण तरीही पण ना पालकमंत्र्यांनी आढावा घेतला ना संबंधित मंत्र्यांनी.

विशेष म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दुर्घटनाग्रस्त पूल हा ब्रिटिशकालीन होता. मे महिन्यांपूर्वीच ऑडिट करण्यात आलं होतं. तो चांगल्या स्थितीत होता पण हा पूल वाहून कसा गेला असं आश्चर्यच व्यक्त केलं. नेहमीप्रमाणे चौकशीचे आदेश देऊन दोषींवर कारवाई करणार असं आश्वसानंही चंद्रकांत पाटलांनी दिलं. भीषण अशी ही दुर्घटना रात्री 11.30 वाजता घडली. त्यानंतर याची माहिती मुख्यमंत्र्यांना रात्री 2 वाजता कळाली. मदत आणि पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांना सकाळी साडे सहा वाजेपर्यंत काय झालं याची माहितीच नव्हती. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनाही सकाळी सहा वाजेपर्यंत काय झालं ते ठाऊक नव्हतं.तर पालकमंत्री प्रकाश मेहता यांना तर सकाळी 9 वाजेपर्यंत या घटनेची माहितीच नव्हती आणि त्यांचा फोनही नॉट रिचेबल होता.

आपत्ती व्यवस्थापन कक्षातून राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी महसूल प्रशासनाला विचारलं, आम्हाला आणि मंत्र्यांना माहिती का दिली नाही ? त्यावर महसूल अधिकार्‍यांनी उत्तर दिलं. “आम्ही मेल केलाय”. यावरून स्वाधीन क्षत्रिय यांनी अधिकार्‍याला चांगलंच झापलं, अशी घटना मेल करतात का? असं शब्दात सुनावलं.

आता प्रश्न असा आहे की, जर मुख्यमंत्र्यांना रात्री 2 वाजता घटना समजते तर त्यांनी मंत्र्यांना बोलावून परिस्थितीचा आढावा घ्यायला हवा होता, त्यांना प्रशासनाशी बोलायला लावायला हवं होतं. तिथे ट्विट करून प्रश्न सुटले का?

सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील सभागृहात सांगतात ” महाडचा पूल सुस्थितीत होता, आम्ही मे महिन्यात पुलाचं ऑडिट केलं होतं”

एकंदरीतच राज्य सरकार नैसर्गिक आपत्तीच्यावेळी किती जागरूक आणि गांभिर्याने विषय हाताळतो याचं उदाहरण म्हणजे महाडची दुर्घटना. जे की सर्व काही माहिती असून निसर्गावर खापर फोडण्याचं काम सरकारकडून सुरू आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close