महाडदुर्घटना : आतापर्यंत काय घडलं ?

August 4, 2016 4:26 PM1 commentViews:

 

महाड अपघातातील 4 ऑगस्ट संध्याकाळपर्यंत सापडलेल्या मृंतदेहांची ओळख

1. अंजर्ले – एसटी चालक कांबळे
2. हरीहरेश्वर – शेवंती मिरगल
3. केंबुर्ली – रंजना वाजे
4. केंबुर्ली – पांडूरंग घाग (दोणवली – चिपळूण)
5. दादलीपूल – आवेद चौगुले
6 म्हसळा-बडदवाडी – प्रशांत प्रकाश माने
7. विसावा कॉर्नर – स्नेहा सुनिल बैकर सैतववाडी
8. केंबुर्ली – प्रभाकर शिर्के एसटी वाहक राजापूर-मुबई चा
9 वराची – महाड रमेश कदम (कोळकेवाडी तास. चिपळूण)
10 आंबेत – मंगेश काटकर, विरार
11 वा मृतदेह आंबेत – सुनिल बैकर (सैतववाडी – रत्नागिरी)
12. आंबेत – अनिस बेलेकर (खंडाळा – रत्नागिरी)
13 वा मृतदेह म्हाप्रळ जयेश बने (बोरीवली – मुंबई)
14 वा मृतदेह केंबुर्ली बाळकृष्ण उरक (नानर-राजापूर)

महाड अपघातात आतापर्यंत एकूण 42 बेपत्ता प्रवाशींची नोंद त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली आहे – दीपक शिंदे

महाड जवळील आणखी दोन मृतदेह सापडले
चौदावा आणि पंधरावा मृतदेह सापडले मृतदेहांची ओळख पटली नाही
तेरावा मृतदेह सापडला, अंबेत म्हाप्रळ येथे सापडला मृतदेह
या मृतदेहाचीही ओळख पटली नाही

दादली पुलाआधी एसटी बसेसचा शोध

महाड दुर्घटनेनंतरच्या शोध मोहिमेत अद्याप एकही अपघातग्रस्त वाहन आढळून आलेल नाही. मात्र आतापर्यंत आढलेल्या मृतदेहांपैकी काही मृतदेह हे एसटी बस मधल्या प्रवाशांचे आहेत. त्यापैकी दोन मृतदेह अपघातस्थळापासून तीन किलोमीटरवर असलेल्या दादली पुलाआधी सापडल्यामुळे एस्टी बसेस याच परिसरात असाव्यात असा विश्वास शोध पथकाना वाटतोय. त्यामुळे नेव्ही आणि एनडीआरएफच्या पथकांनी आता याच परिसरात एस्टी बसेसचा शोध घेण्यास सुरुवात केलीय.

मृतांची यादी

1) एसटी चालक एस.एस. कांबळे (जयगड मुबंई बसचालक) राहणार – चिपळूण, सावर्डे – मृतदेह सापडला अंजर्ले खाडीत
2) रंजना वाझे – (तवेरा गाडीतील प्रवासी) राहणार – घाटकोपर – मृतदेह केंबुर्ली
3) शेवंती मिरगळ (तवेरातील प्रवासी) राहणार – गुहागर – मृतदेह हरिहरेश्वर किनार्‍यावर
4) आवेस चौगुले (राजपूर बोरिवली) राहणार नानवली चिपळूण – दादली पुलाजवळ सापडला
5) पांडुरंग घाग ( राजापूर मुंबई एसटी प्रवासी) राहणार नानवली चिपळूण – महाड केंबुर्लीजवळ सापडला मृतदेह
6) स्नेहल बयकर – राहणार रत्नागिरी सरकोंडी, राजेवाडी जवळ सापडला
7) प्रकाश शिर्के राहणार संगमेश्वर, रत्नागिरी (केंबुर्लीजवळ सापडला)
8) रमेश कदम राहणार नांदिवले चिपळूण – वराटी इथं सापडला
9) प्रशांत माने राहणार – जोगेश्वरी – तोराडी म्हसळा इथे सापडला

– महाड दुर्घटनेतील एसटी वाहक-चालकांच्या कुटुंबियांना 10 लाखाची मदत आणि एसटीमध्ये नोकरी,परिवहन मंत्र्यांची घोषणा
– सातवा मृतदेह सापडला, ओळख पडवण्याचे काम सुरू

– महाड दुर्घटनेत सहावा मृतदेह सापडला. आवेस अल्ताफ चौगुले असं या व्यक्तीचं नावं आहे.18 वर्षांचा आवेस राजापूर – बोरिवली बसमध्ये बसला होता. चिपळूण महाडच्या दादली पुलाजवळ आवेसचा मृतदेह सापडला. यापूर्वी तीन पुरुष आणि दोन महिलांचे मृतदेह सापडेलत.

– महाड पूल दुर्घटनेतल्या तीन बेपत्ता मृतदेहांची ओळख पटलीये. हरिहरेश्वरमध्ये सापडलेला मृतदेह शेवंती मिरगळ यांचा आहे. तर केंबुर्लीत सापडलेला मृतदेह रंजना वझे यांचा आहे. या दोघीही मायलेकी असून त्या मुंबईतल्या वाकोल्याच्या आहेत. दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या तवेरा गाडीतून त्या प्रवास करीत होत्या. तर आंजर्लेच्या समुद्रकिनार्‍यावर सापडलेला मृतदेह जयगड मुंबई बसचे ड्रायव्हर एस.एस. कांबळे यांचा आहे.

 • नेव्हीच्या पथकाला दिसले आणखी दोन मृतदेह…
 • महाड दुर्घटनेतील चौथा मृतदेह दादली येथे सापडला… ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू…
 • सावित्री नदीत एसटीचे पत्रे सापडले,पुलापासून पाच किमी अंतरावरच सापडले पत्रे, एसटीतील सूत्रांची माहिती
 • तवेरा कारमधील सहा जण अजूनही बेपत्ता, मुलांचाही समावेश
 • सावित्री नदीतील शोधमोहिमेदरम्यान एनडीआरएफची बोट उलटली, बचावकार्य सुरू
 • केंबुर्लीजवळ महिलेचा मृतदेह सापडला, मृतांची संख्या तीनवर
 • हरिहरेश्वरजवळ महिलेचा मृतदेह सापडला, मृतांची संख्या दोनवर
 • आंजर्ले किनाऱ्यावर सापडलेला मृतदेह जयगड-मुंबई बसचे चालक एस. एस. मुंडे यांचा असण्याची शक्यता
  - खाकी युनिफॉर्मवर ८२३४ क्रमांकाचा बॅच
 • दापोलीच्या आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावर मृतदेह सापडला
  - मृतदेहाच्या अंगावर खाकी युनिफॉर्म असल्याने तो एसटी चालकाचा असण्याची शक्यता
 • मुंबई-गोवा हायवेवरूनच टवेरा कारमधून प्रवास करणारे आठ जण अजूनही बेपत्ताच
  - कार वाहून गेल्याची भीती
 • रात्री थांबलेली शोधमोहीम सकाळपासून पुन्हा सुरू
  - चुंबकाला काहीतरी वस्तू चिकटल्यानं सुगावा लागण्याची आशाmahad_day_2

=========================================================================================

04 ऑगस्ट :  पोलादपूर आणि महाड मार्गावर सावित्री नदीवर ब्रिटिशकालीन पूल कोसळलाय. या दुर्घटनेचा आज दुसरा दिवस असून शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.  या दुर्घटनेत 22 जण बेपत्ता झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत 7 जणांचे मृतदेह सापडले आहे. एनडीआरएफ, हवाई दल आणि स्थानिक शोधकार्यात सहभागी झाले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


 • Sandeep Bhoyar

  Sagade lok pulajavadch asatil gadyansobat Karan yevadhya puramadhe kontahi mansala gadi baher pasan shakyach nahi. Fakt driver sapadla Karan tyache gate easily ughadu shakate mhanun to wajun gela n Durwar sapadla

close