प्रा. सिरस आत्महत्या प्रकरणी चौघे अटकेत

April 10, 2010 10:53 AM0 commentsViews: 7

10 एप्रिलअलिगढ मुस्लिम विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक, रामचंद्रन सिरस यांच्या आत्महत्येप्रकरणी अखेर चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिरस यांच्या घरात जबरदस्तीने घुसणे आणि त्यांचे शूटिंग करणे असे गुन्हे त्यांच्यावर नोंदवण्यात आलेत. एफआयआरमध्ये एएमयूचे परीक्षा नियंत्रक डॉ. झुबिर खान, फरिद अहमद खान, प्राध्यापक राहत अबरार, मीडिया सल्लागार डॉ. दुराणी यांचेही नाव आहे. त्यासोबतच काही चॅनल्सच्या रिपोर्टर्सची एफआयआरमध्ये नावे घालण्यात आली आहेत. महत्वाची बाब म्हणजे रामचंद्रन सिरस यांचा मोबाईल, अजूनही सापडत नाही. पोलीस त्यांच्या मोबाईलचा शोध घेत आहेत. हा मोबाईल सापडल्यावर काही महत्वाचे धागेदोरे हाती लागतील अशी पोलिसांना अपेक्षा आहे.सिरस यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला होता.

close