पुण्यात एकतानगर परिसरात शिरलं पाणी, रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवलं

August 3, 2016 9:47 PM0 commentsViews:

pune_ekta_nagar3पुणे, 03 ऑगस्ट : राज्यभरात पावसाने धूमशान घातल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. पुण्यातील एकतानगर परिसरात सोसायटयात पाणी शिरलं आहे. नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलंय.

आज दुपारनंतर मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढत गेली. त्यामुळे पर्वती विभागांतर्गत एकतानगर, साईसिद्धार्थ, आनंदपार्क, विठ्ठलनगर, शारदासरोवर सोसायटी, राजपार्क सोसायटी, जलतंरग, जलविहार आदी परिसरातील सखल भागात पुराचे पाणी साचले आहे. एकतानगर परिसरात संरक्षक भिंत पाडण्यात आल्याने ही परिस्थिती झाल्याच नागरिकांचं म्हणणं आहे. दरम्यान, महापौर आणि उपमहापौर घटनास्थळी पोहोचून पाहणी केलीय. पुणे-सिंहगड रोडवरील नदीकाठच्या रहिवाशांना हलवण्यास सुरुवात झालीये. 6 इमारतीतील 100 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं. ब्लू लाईनमधील सगळ्या इमारतीतील नागरिकांना हलवण्यात आलं आहे. खबरदारी म्हणून सर्व परिसरातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close