खाजगी इन्शुरन्स कंपन्यांच्या युलिप योजनेवर बंदी

April 10, 2010 11:03 AM0 commentsViews: 25

10 एप्रिलसेबीने14 खासगी इन्शुरन्स कंपन्यांच्या युलिप योजनांवर बंदी घातली आहे. सेबीने एसबीआय लाईफ, आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ, रिलायन्स लाईफ इन्शुरन्स यांसारख्या बड्या कंपन्यांनाही युलिप योजना आणण्यास बंदी घातली आहे. मात्र यातून सरकारी कंपनी एलआयसीच्या योजना मात्र वगळण्यात आल्या आहेत. खासगी इन्शुरन्स कंपन्यांनी शेअर बाजाराशी संबंधित उत्पादने विकण्यापूर्वी सेबीची योग्य परवानगी न घेतल्याने ही पावले उचलण्यात आली आहेत. सेबीने कोणकोणत्या कंपन्यांच्या युलिप योजनांवर बंदी घातली आहे, ते पाहूयात…ऍगॉन रेलिगेअर लाईफ अव्हिवा लाईफ इन्शुरन्सबजाज अलायन्झभारती ऍक्साबिर्ला सनलाईफHDFC स्टॅण्डर्ड लाईफING वैश्य लाईफकोटक महिंद्रमॅक्स न्यूयॉर्कमेटलाईफ इंडियारिलायन्स लाईफ इन्शुरन्स युलिप म्हणजे काय?युलिप म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसीजयामध्ये गुंतवणूकदाराला विमा संरक्षणासोबतच गुंतवणुकीचाही फायदा एकाच योजनेत मिळतोयामध्ये विम्याच्या हफ्त्यामधील काही हिस्सा शेअर बाजारासंबंधित फंडामध्ये गुंतवला जातोकोणत्या प्रकारच्या फंडात आपली गुंतवणूक केली जावी, याचा निर्णय ग्राहकाला घेता येतो

close