राज्य सुरक्षा महामंडळाला मंजुरी

April 10, 2010 11:45 AM0 commentsViews: 144

10 एप्रिलपोलीस दलावरील बंदोबस्ताचा ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या निर्णयाला विधीमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली. गणेशोत्सव, गरबा आणि अन्य जाहीर कार्यक्रम, तसेच सरकारी आस्थापने आणि व्यक्तिगत सुरक्षेसाठी पोलिसांऐवजी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित संस्थेला अगर व्यक्तिला पैसे मोजावे लागतील, अशी तरतूद असणारा प्रस्ताव शुक्रवारी विधानसभेत मंजूर झाला. या महामंडळात 30 हजार सुरक्षा जवान असतील. यात पहिल्या वर्षात पाच हजार सुरक्षा जवानांची भरती करण्यात येणार आहे. या महामंडळाची नियमावली बनवण्याचे काम सुरू असल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.

close