घटनास्थळापासून 5 किमीअंतरावर एसटीचे अवशेष सापडले

August 4, 2016 5:42 PM0 commentsViews:

mahad_day_2_new04 ऑगस्ट : महाड दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या बसचे काही अवशेष स्थानिक शोध पथकांना सापडले आहे. पूल कोसळला त्या ठिकाणापासून 5 किलोमीटरवर अंतरावर हे अवशेष सापडले आहेत. कोलाडचं एक पथक बचाव मोहिमेत सहभागी आहे.

या पथकाला एसटी बसचे तुकडे सापडलेत. हे अवशेष प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. बुधवारी सावित्री नदीवर पूल कोसळल्यानंतर दोन एसटी बसेस वाहून गेल्या होत्या. यातील कोणत्या बसचे हे अवशेष आहे याचा तपास सुरू आहे. आतापर्यंत 9 मृतदेह सापडले आहे. यात एसटी चालक  कांबळे यांचा समावेश आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close