‘संकटमोचक’ कंडक्टर साहेब, पुलापासून अवघ्या 100 मीटर अंतरावर थांबवली एसटी !

August 4, 2016 6:10 PM0 commentsViews:

04 ऑगस्ट : सावित्री नदीच्या प्रलयात पूल वाहून गेल्याची दुर्घटना घडलीये. या दुर्घटनेत 2 एसटी बसेस आणि खासगी वाहनं वाहून गेली. आतापर्यंत 9 जणांचे मृतदेह सापडले आहे. पण, या भीषण दुर्घटनेच्या काही मिनिटांआधी एका एसटी चालकाने ‘संकटमोचक’ भूमिका साकारली. एसटी चालक सुरेश जाधव यांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळापासून अवघ्या 100 मिटर अंतरावर एसटी बस थांबवली.suresh_jadhav

जाधव यांनी नुसती बस थांबवून प्रवाशांचे आणि आपले प्राण वाचवले नाही तर त्या मार्गावर येणार्‍या इतर वाहनांनाही घटनेची माहिती देऊन दूर राखलं. भांडूप ठाणेहून गुहाघरला निघालेल्या एसटीचे सुरेश जाधव चालक आहे. आम्ही पुलाजवळ पोहोचलो. आमच्यासमोर एक क्वालिस गाडी होती तीने अचानक ब्रेक मारला. खाली उतरून पाहिले असता पूल तुटल्याचं लक्षात आलं. तसंच आम्ही गाडी मागे घेतली आणि चेकपोस्टवर पोहोचलो अशी माहिती जाधव यांनी दिली. जाधव यांच्या या प्रसंगावधानतेमुळे 15 जणांचे जीव वाचले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close