परीक्षेचा पेपरचा नाही छापला…

April 10, 2010 12:01 PM0 commentsViews: 2

10 एप्रिल टीवायबीकॉमचा अकाऊंटस् थ्री चा पेपर छापण्यात दिरंगाई झाल्याने परीक्षेचा हा पेपरच पुढे ढकलण्याची नामुष्की मुंबई विद्यापीठावर ओढवली आहे. 12 एप्रिल म्हणजे सोमवारी हा पेपर होणार होता. पण पेपर छापण्यातच आलेला नाही, असे विद्यापीठाच्या लक्षात आले. त्यामुळे आता हा पेपर 27 एप्रिलला घेण्यात येणार आहे. साधारणत: 1 लाख विद्यार्थी अकाऊंटस् थ्रीचा पेपर देणार आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना होणार्‍या त्रासाबद्दल विद्यापीठाने अजूनही दिलगिरी वक्त केलेली नाही.

close