औरंगाबादमधल्या उद्योजकांची झाली चांदी

October 15, 2008 6:24 AM0 commentsViews: 2

15 ऑक्टोबर, औरंगाबाद – चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील एक एक उद्योग बंद पडत असतानाच या उद्योगांच्या जागांना कोट्यवधींचा भाव आला आहे. कधी काळी उद्योगांसाठी नाममात्र दरात शेती देणारे शेतकरी देशोधडीला लागलेत आणि उद्योजकांची मात्र सर्व बाजूंनी चांदी झाली आहे. चिकलठाण्यातल्या मुकुंदवाडीतील शेतकर्‍यांच्या जमिनी 1966, 1974 आणि 1988 अशा तीन वेळा संपादित केल्या. त्यांना पहिल्यांदा एकरी एक हजार आणि शेवटी एकरी एक लाख रूपये भाव मिळाला. आता याच जमिनीची बाजारभावानुसार किंमत पन्नास लाखांच्या घरात आहे. काही शेतकर्‍यांच्या बागायती जमिनी संपादित करण्यात आल्यात. चिकलठाणा औद्योगिक वसाहतीमुळेच औरंगाबादचा विकास झाला आहे. पण ही वसाहत आता आजारी आहे उद्योग बंद पडले, कामगार बेकार झाले आहेत. उद्योजकांनी दुसरीकडं जागा घेऊन नव्या कंपन्या काढल्या आहेत. उद्योगांची प्रगति आणि शेतकर्‍यांची माती या एसईझेडच्या नाण्याच्या दोन बाजू असतील तरी आता गरज आहे ते नवं धोरण ठरवण्याची. शेतकर्‍यांना केवळ मोबदला देऊन चालणार नाही तर त्यांच्या सर्वांगीण विकासही करावा लागणार आहे. शेती गेली, उद्योग बंद पडले तर आता चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत चकचकीत मॉल्स, शॉपिंग कॉंम्प्ल्‌क्स, पन्नास पन्नास लाखांचे बंगले उभे रहात आहेत. एस ई झेडसाठी जागा संपादित करताना उद्योगांचा हा प्रवास बदलावा लागेल, हेच यावरून स्पष्ट होत आहे.

close