गिरगावमध्ये इमारतीचा भाग कोसळला, जीवितहानी नाही

August 4, 2016 10:27 PM0 commentsViews:

girgaonमुंबई, 04 ऑगस्ट :  गिरगावमध्ये गुरुवारी संध्याकाळी एका इमारतीचा काही भाग कोसळलाय. सि पी टँक परिसरातील वासुदेव नावाच्या तीन मजली इमारतीचा पहिल्या आणि दुसर्‍या मजल्याचा काही भाग कोसळला होता. या दुर्घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

रुग्णवाहिका सहीत अग्निशमन दलाचे 9 बंब घटनास्थळी वेळीच पोहोचले. तातडीने शोधकार्य हाती घेऊन. 5 लोकांची सुटका करण्यात आलीये. या दुर्घटनेत एका जखमी महिलेला अग्निशमन दलाच्या जवानांनी रुग्णालयात दाखल केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close