आंबेडकरांची आठवलेंवर टीका

April 10, 2010 12:17 PM0 commentsViews: 6

10 एप्रिल भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांच्यावर टीका केली आहे.दलित चळवळीला संपवण्याचा प्रयत्न करणारे आता स्वत:च संपले असून त्यांना काँग्रेस पक्षांने लाथाडले आहे. त्यामुळे त्यांचे अस्तित्वच संपले आहे, असे आंबेडकर औरंगाबादमध्ये म्हणाले. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत रिडालोसचे फारसे अस्तित्व नाही. महापालिकेचा निवडणूक प्रचार संपल्यान्ने धनाढ्य उमेदवार शेवटच्या रात्री पैसै आणि दारू वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री दहाच्या नंतर भारिप बहुजन संघाचे कार्यकर्ते यावर लक्ष ठेवणार असल्याचेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

close