रस्ता दरीत कोसळल्यानं महाबळेश्वर- पोलादपूर वाहतूक ठप्प

August 5, 2016 1:44 PM0 commentsViews:

Mahabaleshwar21

05 ऑगस्ट :  महाबळेश्वर-पोलादपूर घाटातील रस्ता दरीत कोसळल्यानं महाबळेश्वर-पोलादपूर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या घाटातील रस्त्यांना भल्या मोठ्या भेगाही पडलेल्या आहेत.

संततधार पावसामुळे महाबळेश्वर-पोलादपूर घाटाची दुरवस्था झाली असून, प्रशासनाच्या कोणत्याही अधिकार्‍याचे याकडे लक्ष नाही. या घाटातील रस्ता खचून एक हजार फूट खोल दरीत कोसळल्यानं मोठ्या वाहनांसाठी रस्ता बंद करण्यात आलेला आहे.

महाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन विभागानेही खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरून जाणारी एसटी वाहतूकही बंद केली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close