प्रोटीन पावडरच्या खरेदीत सिंधुदुर्गमध्ये भ्रष्टाचार

April 10, 2010 12:25 PM0 commentsViews: 8

10 एप्रिलसिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंगणवाडीतील मुलांना पूरक पोषण आहाराअंतर्गत देण्यात येणार्‍या प्रोटीन पावडरच्या खरेदीत 37 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी महाराष्ट्र स्टेट कन्झ्युमर्स फेडरेशनकडे प्रोटीन पावडरची ऑर्डर नोंदवली होती. एमएससीएफने ही पावडर, उत्तराखंडच्या सिनकॉम कंपनीकडून खरेदी केली. आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडे पाठवली. सिनकॉम कंपनीने यामध्ये प्रोटीनचे प्रमाण 20 टक्के असल्याचा दावा केला. पण प्रत्यक्षात हे प्रमाण 8 टक्केच असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी आता संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सीओंनी सांगितले आहे. तर विरोधी पक्षांनीही या गैरव्यवहाराच्या चौकशीची मागणी केली आहे.

close